रावेरात जेवणाच्या दर्जावरुन जिल्हाधिकारी संतप्त

0

रावेर : जिल्हाधिकार्‍यांनी गुरुवारी रावेरातील कोविड केअर सेंटरला भेट दिली असता अल्प प्रमणातील जेवण पाहून जिल्हाधिकारी चांगलेच भडकले. जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांनी सावदा व रावेर येथे कोविड केअर सेंटरला भेट देवून पाहणी केली. रावेर कोविड केअर सेंटर येथे पाहणी करून निघत असतांना जेवण घेवून एक जण आला व त्याच्यावर लक्ष जाताच जिल्हाधिकारी गाडीत न बसता पुन्हा कोविड सेंटरमध्ये गेले. त्या ठिकाणी त्यांनी जेवण पाहिले व ते भडकले. पार्सल पन्नी व अल्प प्रमाणात जेवण असल्याचे दिसल्यावर त्यांनी खडेबोल सुनावले. 150 रुपये शासन देत असतांना त्या प्रमाणात जेवणाचा दर्जा नसल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली.

जिल्हाधिकारी संतप्त होताच उडाली खळबळ
जेवणासोबत प्लेटदेखील नव्हत्या शिवाय जेवणाची व्यवस्था महसूल विभागाकडून होत असतांना मुख्याधिकारी यांच्यावर जिल्हाधिकारी भडकल्यामुळे चर्चा रंगली. कापूस खरेदी केंद्र व सावदा येथे ही जिल्हाधिकारी यांनी भेट दिली. कापूस व्यापार्‍यांनी मजूर हे मध्यप्रदेश मधून आणण्यासाठी पासची मागणी केली. त्यांना पास उपलब्ध करून देण्याविषयी संबंधितांना सूचना प्रसंगी करण्यात आल्या.

Copy