रावेर : रावेर शहरातील रामचंद्र नगर परीसरातील बंद घर चोरट्यांनी फोडल्याने रहिवाशांमध्ये भीती पसरली. चोरट्यांनी घरातील काही रोकड लांबवण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. घर मालक बँकेत नोकरी असून ते बाहेरगावी असल्याने नेमका काय मुद्देमाल चोरीला गेला हे कळू शकले नाही. या प्रकरणी रावेर पोलिसात गुन्हा दाखल नसल्याचे सूत्रांनी सांगितले.
