रावेरात गौण खनिजच्या वाहतुकीसाठी अस्तित्वात नसलेल्या रस्त्याची पावती

रावेर : मध्यप्रदेशातून रावेर तालुक्यात दाखवण्यात आलेल्या गौण खनिजाच्या पावतीवर वाळुने भरलेल्या ट्रॅक्टर-ट्रॉलीचा रूट नाचणखेडा (बर्‍हाणपूर) येथून अटवाडा दाखवण्यात आला असलातरी प्रत्यक्षात नदीवर कोणताही पूलच नाही. दाखविलेला रूट बोगस असून रावेरात जप्त असलेले ट्रॅक्टर सोडण्यासाठी अश्या पावत्यांचा उपयोग घेतला जात आहे. ‘जनशक्ती’ने मध्यप्रदेशातील गौण खनिजाच्या पावत्यांद्वारे जप्त केलेले अवैध वाळूचे ट्रॅक्टर-ट्रॉली महाराष्ट्रात कशा पद्धत्तीने सोडले जात आहे व यामुळे महसूल प्रशासनाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असल्याबाबत वृत्त प्रसिद्ध करून प्रशासनाचे लक्ष वेधले होते. याबाबत ‘जनशक्ती’च्या हाती धक्कादायक पुरावा लागला असून मुळात मध्यप्रदेशच्या ट्रॅक्टर पावतीचा रूट बोगस आहे. नाचणखेडा टू अटवाडा मुळात ट्रॅक्टरचा रस्ता नसून दिलेली पावती जप्त असलेले ट्रॅक्टर सोडण्यासाठी वापरली जात असल्याचा दावा केला जात आहे.

‘जनशक्ती’कडे बोगस रूटची पावती
मध्यप्रदेशच्या नाचणखेडा येथील बोगस रूट दाखविण्यात आला असून दिलेल्या पावतीवर अवैध वाळुचा रूट नाचणखेडा टू अटवाडा दोघे, नेहता, खिरवळ, पातोंडी, पुनखेडा, रावेर असा रूट दाखवण्यात आला असलातरी मूळात नाचणखेडा टू अटवाडासाठी ट्रॅक्टर वाहतुकीचा कोणताही मार्ग नाही त्यामुळे ही पावती निव्वळ रावेर तहसील कार्यालयात जप्त ट्रॅक्टर सोडण्यासाठीच वापरली जात असून त्यामुळे शासनाच्या लाखोंचा महसुलला मात्र चुना लागत आहे.

Copy