रावेरात कोविड 19 परवानगी कक्षाची स्थापना

0

रावेर : कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन कालावधीमध्ये परराज्यातसह परजिल्ह्यातील बहुतांश नागरीक हे कामानिमित्त जळगाव जिल्ह्यात अडकले असून नागरीकांना जळगाव जिल्ह्यातून संबंधितांना त्यांच्या इच्छित स्थळी जाण्यासाठी व जळगाव जिल्ह्यात येण्यासाठी आवश्यक असलेली परवानगी देण्यासाठी जिल्हाधिकारी यांना सक्षम प्राधिकारी म्हणुन घोषीत केलेले आहे. तसेच शासनाच्या संकेत स्थळावर ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून ज्या नागरीकांना ऑनलाईन अर्ज भरता येत नाही अशा रावेर तालुक्यातुन परराज्यात/परजिल्ह्यात जाणार्‍या नागरीकांसाठी रावेर तहसील कार्यालयात ‘कोवीड – 19 प्रवासी सहायता कक्ष’ तसेच ‘कोवीड – 19 प्रवासी परवानगी कक्ष’ स्थापन करण्यात आला आहे. ज्या नागरीकांना प्रवासाबाबत काही अडचणी असल्यास त्यांनी तहसील कार्यालय, रावेर येथील कोवीड – 19 प्रवासी सहायता कक्षामध्ये विचारणा करावी तसेच ज्या नागरीकांना रावेर तालुक्यातून आपल्या इच्छित स्थळी जाणेकामी ऑनलाईन अर्ज करता येत नाही त्यांनी आवश्यक माहितीसह तहसील कार्यालय, रावेर येथील सेतु सुविधा कक्षामध्ये स्थापन केलेल्या कोवीड – 19 प्रवासी परवानगी कक्षामध्ये आपला अर्ज नि : शुल्क भरून घ्यावा, असे आवाहन तहसीलदार उषाराणी देवगुणे यांनी केले आहे.

Copy