रावेरात केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी : प्रशासनाला निवेदन

रावेर : भारत बंदला रावेरात अपेक्षित प्रतिसाद मिळाला नसलातरी काँग्रेस भवनापासून केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत सर्वपक्षीय पदाधिकार्‍यांनी रावेर तहसील पर्यंत मोर्चा काढत निवासी नायब तहसीलदार सी.जी.पवार यांना निवेदन दिले. केंद्र सरकारने पारीत केलेले काळे कृषी कायदे मागे घ्यावे म्हणून केंद्र सरकारच्या विरुध्द आज भारत बंदची हाक देण्यात आली होती. याप्रसंगी रावेर काँग्रेस-राष्ट्रवादीतर्फे प्रशासनाला निवेदन देण्यात आले.

यांची होती उपस्थिती
निवेदन देताना काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष नीळकंठ चौधरी, काँग्रेस महिला उपाध्यक्ष मानसी पवार, राष्ट्रवादीचे सोपान पाटील, राष्ट्रवादी शहराध्यक्ष महेमूद शेख, राजू सवर्णे, माजी नगराध्यक्ष हरीष गनवाणी, पंकज वाघ, सावन मेढे, राजदचे प्रशांत बोरकर, दिलीप कांबळे आदींची यावेळी उपस्थिती होती.

Copy