रावेरात इंधनवाढ विरोधात काँग्रेस पदाधिकार्‍यांची निदर्शने

रावेर : केंद्रातील भाजपा सरकारकडून सातत्याने होत असलेल्या इंधनवाढी विरोधात काँग्रेसकडून सोमवारी राज्यव्यापी आंदोलन करण्यात आले. रावेर शहरातील स्थानिक काँग्रेस पदाधिकार्‍यांनी वेगवेगळ्या तीन ठिकाणच्या पेट्रोल पंपावर जाऊन निदर्शने करण्यात आली.

यांची होती उपस्थिती
रावेर झालेल्या इंधन दरवाढ निदर्शनात आमदार शिरीष चौधरी, अनुसूचित जमाती जिल्हा कार्याध्यक्ष राजू सवर्णे, काँग्रेस तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, बाजार समितीचे माजी सभापती राजू पाटील, अ‍ॅड.योगेश गजरे, सुरेश पाटील, महेश लोखंडे आदी उपस्थित होते. रावेर शहरातील तीन ठिकाणच्या पेट्रोल पंपावर काँग्रेस पक्षाकडून प्रसंगी निदर्शने करण्यात आले व मोदी सरकारविरुध्द जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी मोठ्या संखेने काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.