Private Advt

रावेरात अज्ञात वाहनाच्या धडकेत वयोवृद्धाचा मृत्यू

रावेर : रात्रीच्या जेवणानंतर फिरण्यासासाठी गेलेल्या 60 वर्षीय वृद्धाला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने वत्रद्धाचा मृत्यू झाला. बुधवारी रात्री ही घटना घडली. रावेर पोलिसात या प्रकरणी अपघाताची नोंद करण्यात आली. शिवाजी नारायण सोनवणे (60, अष्टविनायक नगर, रावेर) असे मयताचे नाव आहे. शिवाजी सोनवणे हे बुधवारी रात्री साडे आठ वाजेच्या सुमारास जेवणानंतर शत पावली करण्यासाठी बाहेर पडल्यानंतर बर्‍हाणपूर-अंकलेश्वर महामार्गावरून पायी जात असताना हॉटेल गुलमोहोरसमोर बर्‍हाणपूरकडे जाणार्‍या अज्ञात वाहनाने मागुन धडक दिल्याने शिवाजी सोनवणे हे गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारार्थ रुग्णालयात नेण्यात आल्यानतंर उपचार असताना त्यांचे निधन झाले. याबाबत योगेश कन्हैय्या मराठे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात वाहन चालकाविरुद्ध रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास फौजदार अनिस शेख करीत आहेत.