रावेरातील प्रत्येक नागरीकांचे थर्मल स्क्रिनींग करा

0

रावेर : शहरातील सर्व नागरीकांचे थर्मल स्क्रिनिंग करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहे. यासाठी नगरपालिकेचे पाच पथक तयार करण्यात येणार आहे. प्रत्येक पथकात तीन सदस्य, एक थर्मामीटर, शरीरातील ऑक्सीजन मोजण्याचे उपकरण देण्यात आले असल्याची माहिती मुख्याधिकारी रविंद्र लांडे यांनी ‘जनशक्ती’शी बोलतांना दिली.

पाच पथकांद्वारे होणार तपासणी
शहरात कोरोनाचा शिरकाव वाढला असल्याने शहरातील प्रत्येक घरात जावून प्रत्येक सदस्यांची थर्मल तपासणी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहे. त्यानुसार शहरातील तपासणी सर्वे करण्यासाठी पाच पथक तयार करण्यात आले असून प्रत्येक पथकाकडे ताप व ऑक्सीजन मोजण्याचे कीट देण्यात आले आहे. सदरील पथक रावेर शहरातील प्रत्येक घरी जावून तपासणी करणार आहे. शहरातील प्रत्येक घरी जावून कुटुंब प्रमुखांची नावाची नोंद करण्यात येणार आहे. यावेळी घरातील वयोवृध्द, लहान मुले, बाहेरगावाहून आलेले सदस्यांची तपासणी होणार आहे. शरीराचे तापमान क्षमतेपेक्षा जास्त असेल तर त्यांची ऑक्सीजन चाचणी केली जाईल तसेच ऑक्सीजन चाचणीतही काही दिसून आले तर अश्या नागरीकांना रावेर ग्रामीण रूग्णालयात एक्स-रे काढण्यात येणार आहे. एक्स रे रीपोर्टमध्ये कोरोनाची काही लक्षणे आढळून आल्यास त्यास क्वॉरंटाईन करण्यात येणार आहे. दरम्यान, गेल्या दोन दिवसात तीन रुण आढळून आले असून तिघांना ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, आरोग्य विभागाचे कर्मचारी सर्वेक्षणासाठी आले असता त्यांना प्रत्येक नागरीकांनी सहकार्य करावे, असे आवाहन मुख्याधिकारी रविंद्र लांडे यांनी केले आहे.

Copy