रावेरातील कोविड सेंटरमधून पलायन : निंभोर्‍याच्या सात जणांविरुद्ध गुन्हा

0

रावेर : रावेर शहरातील समाज कल्याण हॉस्टेलमध्ये बनवण्यात आलेल्या कोविड सेंटरमध्ये स्वॅब घेवून तपासणीसाठी आलेले सात संशयीत रुग्ण कोणालाही काही न सांगता पसार झाल्याने त्यांच्याविरुद्ध रावेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने रावेर तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. 6 रोजी दुपारी पावणे दोन वाजेच्या सुमारास ही घटना घडली. रावेर ग्रामीण रुग्णालयाचे सलीम कालेखाँ तडवी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार रावेर पोलिसात भाग 6, गुरनं 44/20 भादंवि कलम 188,269,270 सह राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कलम 51 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. तपास नाईक महेंद्र सुरवाडे करीत आहेत.

कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती
संशयीतांना निंभोरा येथून रावेर येथे बनविलेल्या कोवीड 19 केअर सेंटर येथे कोरोना संशयीत रुग्ण म्हणून आणण्यात आले होते शिवाय त्यांचे स्वॅब घेवून त्यांना कोरंटाईन करण्यात येणार होते मात्र कुणालाही काहीही न सांगता पसार झाल्याने व त्यांच्यामुळे कोरोना संसर्ग वाढण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.