रावेरसह 58 गावांचा गड राखताय पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे

0

रावेर (शालिक महाजन) : रावेर शहरासह 58 गावांची मदार अवघ्या 42 पोलिसांवर असल्याने येथे वारंवार कायदा-सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याने कर्मचारी संख्या वाढवणे काळाची गरज आहे. रावेरात काही महिन्यांपूर्वी झालेल्या दंगलीनंतर ओढवलेल्या कोरोनाच्या संकटामुळे रुग्ण आढळताच कंटेन्मेंट झोनमध्ये बंदोबस्त पुरवणे, लॉकडाऊनचे पालन करणे शिवाय गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासह जनतेत समन्वय निर्माण करण्याची यशस्वी भूमिका रावेरचे निरीक्षक रामदास वाकोडे निभवत आहेत. त्यांच्या काळात मोठ्या प्रमाणावर गुन्ह्यांमध्ये घट झाल्याचे दिसून येते.

अहोरात्र राबताय कोरोना योद्धे
पोलिसांचे संख्याबळ अपूर्ण असलेतरी कायदा-सुव्यवस्थेच्या सर्व आघाड्यांवर निरीक्षक वाकोडे सरस ठरत आहे शिवाय प्रत्येक पोलिसांच्या आरोग्याचीदेखील विशेष काळजी घेतली जात असल्याने कोरोना व्हायरस सुध्दा रावेर पोलिस स्टेशनपासून लांब आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी नरेंद्र पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे दररोज आपल्या पोलिस स्टेशनच्या कर्मचार्‍यांची पल्स ऑक्सीमीटरने तपासणी करीत असून कर्मचार्‍यांना आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहनही करीत आहेत.

लॉकडाऊनपासून गुन्हेगारी घटली
21 मार्च रोजी कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर लॉकडाऊन जाहीर झाले तर रावेर दंगलीचा अपवाद सोडल्यास इतर गुन्हेगारींमध्ये प्रचंड घट झाली आहे. गेल्या चार महिन्यांमध्ये तीन घरफोडी झाल्या व त्यापैकी दोन घरफोड्याचा तपास लावण्यात पोलिसांना यश आले तसेच 15ा झाल्या असून त्यापैकी चार चोर्‍या पोलिसांनी उघड केल्या आहेत शिवाय अन्य गुन्ह्यांमध्ये घट झाली आहे.

पोलिसांचे अपूर्ण संख्याबळ ठरतेय डोकेदुखी
रावेर पोलिस स्टेशनच्या हद्दीत रावेर शहरासह तब्बल 58 गावे येतात. असे असलेतरी कायदा-सुव्यवस्था ठेवण्याची मदार अवघ्या 42 पोलिसांवर आहे. यामध्ये एका पोलिस निरीक्षकांसह एक सहा.पोलिस निरीक्षक, दोन पोलिस उपनिरीक्षक तर 42 पोलिस कर्मचारी असल्याने गुन्हेगारांवर वचक ठेवण्यासाठी पोलिसांची प्रचंड तारांबळ उडते मात्र अशा कठीण परीस्थितीतही निरीक्षक वाकोडे व त्यांचे सहकारी संकटाशी दोन हात करीत आहेत.

सात गावे अतीसंवेदनशील
रावेर शहरात काही महिन्यांपूर्वी दंगल घडल्यानंतर शहर पुन्हा चर्चेत आले. पोलिस दप्तरी रावेरची संवेदनशील शहर म्हणून ओळख आहे तसेच रसलपूर, अहिरवाडी, कुसुंबा, मोरगाव, पाल व खिरवड या गावांचीही देखील संवेदनशील म्हणून ओळख आहे. मध्य प्रदेशची पूर्वेकडून चोरवड सीमा तर उत्तरेकडून पाल सीमा याच रावेर पोलिस स्टेशनला लागून आहे.

पोलिसांची संख्या वाढण्याची गरज
रावेर पोलिस स्टेशन हे प्रचंड हेवी असून अती संवेदनशील आहे तर पोलिस स्टेशनला मध्य प्रदेश सीमा लागूण असल्याने येथे गुन्हेगारीचे प्रमाणदेखील तेव्हढेच आहे. अनेक वेळा सामाजिक तेढ सुध्दा निर्माण होतात यातुनच कायदा-सुव्यवस्थाचा प्रश्न निर्माण होतो म्हणून येथे कमीत-कमी 60 पोलिसांचे मनुष्यबळ असणे गरजेचे आहे.