रावेरला 25 नोव्हेंबर रोजी बारी समाजाचा वधु-वर परीचय मेळावा

0

रावेर- शहरात सूर्यवंशी बारी समाजाचा राज्यस्तरीय वधू-वर परिचय मेळावा 25 नोव्हेंबर रोजी होणार आहे. नागवेल युवा फौंडेशनतर्फे हा दुसरा राज्यस्तरीय वधू-वर परीचय मेळावा होणार आहे. या संदर्भात चर्चा करण्यासाठी युवा फाउंडेशनचे अध्यक्ष राहुल अस्वार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यात परीचय मेळाव्याचे आयोजन समितीच्या अध्यक्षपदी योगेश पाटील यांची निवड करण्यात आली. त्यावेळी मेळाव्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. मनोज बारी, दिलीप बारी, संदीप बारी, पंकज बारी, चंदू बारी, दीपक मिस्तरी, सुधाकर बारी, सचिन बारी, चेतन बारी, महेश बारी, अविनाश बारी, नकुल बारी, विशाल बारी आदी उपस्थित होते. वधू-वर परीचय मेळाव्यासाठी नोंदणी करावी, असे आवाहन फौंडेशनचे अध्यक्ष राहुल अस्वार व समिती अध्यक्ष योगेश पाटील यांनी केले आहे.

Copy