रावेरला 14 रोजी महिलांचा नवज्योती कृषीसेवक पुरस्काराने होणार गौरव

0

नवरात्रोत्सवात स्त्री शक्तीचा जागर ; कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवल्याने कार्याची दखल

रावेर- विविध क्षेत्रात कार्य करीत आपल्या कर्तृत्वाने ठसा उमटवित समाज विकासासाठी योगदान देणार्‍या महिलांचा नवरात्रोत्सव निमिताने येथे स्त्री शक्तीचा जागर करण्यात येत आहे. अशा महिलांना 14 ऑक्टोबरला नवज्योती कृषीसेवक पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. महिलांचा सन्मान व्हावा या दृष्टीकोनातून विविध क्षेत्रात कार्य करणार्‍या तालुक्यातील महिला, महिला कृषी विज्ञान मंडळ व महिला बचत गटांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना नवरात्रोत्सवात सन्मानित करण्यात येत आहे. हा कार्यक्रम 14 रोजी येथील मराठा समाज मंगल कार्यालयात सकाळी आकरा वाजता होणार आहे.

यांची राहणार प्रमुख उपस्थिती
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार शिरीष चौधरी असतील. माजी आमदार अरुण पाटील यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन होईल. सावदा येथील डॉ.उल्हास पाटील सीबीएससी स्कूलच्या प्राचार्य भारती महाजन यांच्या हस्ते पुरस्कार वितरण होणार आहे. कार्यक्रमास जिल्हा परीषद उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, राष्ट्रवादी किसान सभा जिल्हाध्यक्ष सोपान पाटील, पंचायत समिती सभापती माधुरी नेमाडे, नगराध्यक्ष दारा मोहम्मद, उपनगराध्यक्ष सुरज चौधरी, जिल्हा परीषदेचे माजी शिक्षण सभापती सुरेश धनके, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन, जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष विरेंद्र भोइटे, जिल्हा परीषद सदस्या रंजना पाटील, पंचायत समिती सदस्या प्रतिभा बोरोले, योगीता वानखेडे, शिवसेना तालुकाध्यक्ष योगीराज पाटील, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष नीळकंठ चौधरी, भाजपा तालुकाध्यक्ष सुनील पाटील, काँग्रेस तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, प्रा.प्रकाश मुजूमदार, माजी नगराध्यक्ष हरीष गनवाणी, रघुशांती फाउंडेशन उपाध्यक्ष लीलाताई पाटील, भारती ज्वेलर्स संचालिका भारती गनवाणी, उद्योजक श्रीराम पाटील, जितेंद्र पवार, नगरसेविका संगीता महाजन, संगीता अग्रवाल, शारदा चौधरी, तालुका कृषी अधिकारी सुधाकर पवार, वनपरिक्षेत्राधिकारी राजेंद्र राणे, मुख्याधिकारी रवींद्र लांडे, जिल्हा परीषदेच्या माजी सदस्य कोकिळा पाटील, पंचायत समितीच्या माजी सदस्य रेखा चौधरी, ज्ञानेश्वरी दुर्गा उत्सव मंडळाच्या अध्यक्ष आशालता राणे, सावखेडा सरपंच मीना पाटील, माध्यमिक शिक्षक कर्मचारी पतपेढी अध्यक्ष देवयानी पाटील आदींची उपस्थिती राहणार आहे. कार्यक्रमास उपस्थितीचे आवाहन आयोजक कृष्णा पाटील यांनी केले आहे.

Copy