रावेरला पाटणा-पुणे, महानगरी एक्सप्रेसला थांबा मिळावा

0

रावेर । तालुका भारिप बहुजन महासंघाची बैठक जुने विश्रामगृह येथे तालुका अध्यक्ष बाळु शिरतुरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीत राष्ट्रीय नेते बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवस साजरा करणे तसेच रावेर रेल्वे स्थानकावर प्रवाशांच्या सोयीसाठी पटणा पुणे व महानगरी एक्सप्रेस या गाड्यांना थांबा मिळावा यासह अनेक विषयावर चर्चा करण्यात आली.

तळागाळात जाऊन पक्षबांधणी मजबूत करा
अध्यक्षीय भाषणात शिरतुरे असे म्हणाले की, पक्ष बांधणीचा उत्साह विचारात घेवून भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या संकल्पेतील बहुजन विचारधारा भक्कम करण्यासाठी भारिप बहुजन महासंघाचे विचार दुर्बल घटकांपर्यंत पोहचवून पक्ष बांधणीसाठी विविध जाती जमाती व बहुजनांचे, मुस्लिमांचे, ओबीसी, आदिवासीचे संघटन करुन पक्ष बांधणी करावी. तसेच पक्षाचे ध्येय धोरण व उद्दीष्टे लक्षात घेवून पक्ष बांधणी करावी. तसेच तालुक्यातील जनतेच्या सेवेसाठी कार्यकर्त्यांनी तत्पर राहायला पाहिजे. या बैठकीत संजय गांधी योजना, इंदिरा योजना, श्रावणबाळ योजना, कुटूब अर्थसय्य योजनांबाबत त्वरीत मिळणे, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या माध्यामातून मिळणार्‍या योजनाच्या लाभ त्वरीत मिळणे, स्वस्त धान्य दुकानामधील रेशनचा माल वेळेवर मिळणे अशा विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. या बैठकीस महेश तायडे, दिपक तायडे, रफिक बेग रहेमान पिंजारी, समाधान वाघ, भास्कर वाघ, राहुल गायकवाड, सदाशिव निकम, अनिल तायडे, संदिप शिरतुरे, देवेंद्र पांडव, सिताराम वानखेडे, संदिप गाढे यांसह तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.