रावेरला पंचायत समितीत प्रथमच फुलले कमळ

0

रावेर । जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक नुकतीच पार पडली. यात पंचायत समितीच्या स्थापनेपासुन पहील्यांदाच गणामध्ये ऐवढया मोठ्या प्रमाणात कमळ फुलवण्याच्या परिक्षेत तालुकाध्यक्ष सुनील पाटील उत्तीर्ण झाले मिळाले असून बारा पैकी आठ जागेवर भाजपाचा विजय करुन समिति ताब्यात घेण्यात यश आले आहे.
पूर्वी रावेर तालुका कॉग्रेस पक्षाचा गड मानला जायचा आमदार, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिति सर्व कॉग्रेसच्या ताब्यात होती.

तालुका पिंजून काढून निवडून आणले सदस्य
यंदा निवडणुकीपूर्वी सर्वच पक्षांनी तालुकाध्यक्षांच्या भाकरी पलटवुन सर्वांसाठी ही निवडणूक स्वत:ला सिद्ध करायची होती. त्यात कॉग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना यांना अपेक्षित यश मिळवता आले नसून प्रथमच भाजपच्या तालुकाध्यक्षांची जबाबदारी युवा तसेच मनमिळावू वाघोड़ येथील सुनील पाटिल यांच्याकड़े गेली त्यांनी संपूर्ण तालुका पिंजुन काढून जिल्हा परिषदेत चार तर पंचायत समितीत आठ सदस्य निवडून आणले आहेत.

निवडणूकीत यांचा झाला विजय
सुनिल पाटील हे वाघोड येथील प्रगतिशील शेतकरी असून वयाच्या 18 वर्षापासून ग्रामपंचायत सदस्य होऊन भाजपाशी जुळले निवडणुकीपूर्वी पक्षाने तालुक्याची जबाबदारी दिल्याने त्यांनी निवडणूक न लढवता पक्षासाठी निष्ठेने काम केले. तालुक्यातील पाल गणातुन पी.के. महाजन, केर्‍हाळा येथे कविता कोळी, तांदलवाडी कविता कोळी, खिरवळ जुम्मा तड़वी, ऐनपुर जितेंद्र पाटील, चिनावल माधुरी नेमाड़े, मस्कावद अनिता चौधरी हे सर्व भाजपाचे उमेदवार निवडून आले आहेत.