रावेरला तुर खरेदी केंद्राला प्रतिसाद

0

रावेर । यंदा तुरीचे हंगाम जास्त झाल्याने आतापर्यंत खरेदी विक्री संघाने 2 हजार 100 क्विंटल तुरी खरेदी केलेले आहे. येथील वखार महामंडळात ही तुरी खरेदी केंद्र सुरु असून शेतकर्‍यांकडून या केंद्राला भरभरुन प्रतिसाद मिळत आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती मार्फत तहसिल विभागाने सुरु केलेले खरेदी केंद्रावर आतापर्यंत सुमारे एक कोटीची तुर खरेदी झाली असून 131 शेतकर्‍यांनी तुर मिळण्यासाठी मार्केट कमिटीत नंबर लावला आहे. येथील वखार महामंडळाच्या आवारात ट्रॅक्टरांमध्ये भरलेल्या तुरांची रांगा लागलेल्या दिसत आहे.

यंदा तुरीचे उत्पादन चांगले झाले असून मार्केट भावापेक्षा जास्त भाव शासन देत आहे. सुरुवात असून सुमारे पाच हजार क्विंटलात तर आम्ही खरेदी करु. प्रत्येक शेतकर्‍याला आम्ही तुरीच्या माध्यमातून खरेदी करु. त्याकरीता मार्केटला नंबर लावावा. नंबर आल्यावर स्वतःहून मार्केट कॉल करुन बोलावणार आहे.
– पितांबर पाटील, संचालक, बाजार समिती

दीड हजार रुपये जादाचा भाव
प्रशासन शेतकर्‍यांकडून 5 हजार 500 रुपयांचा भाव आहे. मार्केट भावापेक्षा 1 हजार 500 रुपये शासन जास्त देत असल्याने शेतकरी तुरी विकण्यासाठी लांब लचक रांग लागलेली आहे. वखार महामंडळाच्या आवारात तुरीने भरलेली ट्रॅक्टरची मोठी गर्दी होत आहे. अनेक शेतकरी ट्रॅक्टर लावून तेथेच आराम करीत असून पाल, रावेर, उटखेडा लॉनवर एकच गर्दी होत आहे.