रावेरला एकाची गळफास घेऊन आत्महत्या

0

रावेर : शहरातील जी.एस.कॉलनीत राहणार्‍या 30 वर्षीय युवकाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी रात्री घडली. राजेश कैलास न्यायते असे आत्महत्या करणार्‍या युवकाचे नाव आहे. बुधवारी रात्री राजेशने राहत्या घरात किचनमधील कापडी पडद्याच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. रावेर ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ. पाटील यांनी शव विच्छेदन केले. रावेर पोलिसात याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही. पुढील तपास एएसआय आय.आय.शेख करीत आहेत.

Copy