रावेरची शांतता भंग करणार्‍यांवर पोलिसांची करडी नजर

0

जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले : बकरी ईद शांततेत साजरी करण्याचे आवाहन

रावेर : कोरोनाच्या महामारीत आलेली बकरी ईद शांततेत साजरी करा, शासनाने दिलेल्या सूचनेप्रमाणे बकरी ईद साजरी करावी शिवाय कुणीही कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न कोणीही निर्माण करू नये शहराची शांतता भंग करणार्‍यांवर पोलिसांची करडी नजर असल्याचे जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले येथे म्हणाले. बकरी ईदच्या अनुषंगाने रावेर पोलिस ठाण्यात बैठकीचे आयोजन करण्यात आले.

यांची होती उपस्थिती
बैठकीला अपर पोलिस अधीक्षक भाग्यश्री नवटके, प्रांताधिकारी डॉ.अजित थोरबोले, पोलिस उपविभागीय अधिकारी नरेंद्र पिंगळे, रावेर नगराध्यक्ष दारा मोहम्मद, पालिकेचे मुख्यधिकारी रवींद्र लांडे, पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे, सहाय्यक निरीक्षक शीतलकुमार नाईक, पोलिस उपनिरीक्षक सुनील कदम, मनोज वाघमारे तसेच माजी नगराध्यक्ष हरीष गनवाणी, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन, माजी शिक्षण सभापती सुरेश धनके, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष नीळकंठ चौधरी, काँग्रेस तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, अ‍ॅड. योगेश गजरे, कामगार नेते दिलीप कांबळे, नगरसेवक राजेंद्र महाजन, शेख साजीद, असदउल्ला खा, गोपाळ बिरपन, बाळु शिरतुरे, पोलिस पाटील लक्ष्मीकांत लोहार, शेख मेहमूद, अशोक शिंदे, ई.जे.महाजन, मुस्लिम पंच कमेटी शेख गयास, रफीक टेलर, आरीफ सैय्यद, नितीन पाटील, हिरालाल सोनवणे, सरपंच अनिल चौधरी, शेख कौसर, तन्वीर खान, शेख अख्तर हुसेन अयूब खा, अब्दुल कदीर, शेख कलीम, दिनकर वानखेडे, वन विभागाचे धोबी, पशु वैद्यकीय अधिकारी रणजीत पाटील, डॉ.सुरेश पाटील, संतोष पाटील, शैलेंद्र अग्रवाल आदी उपस्थित होते.

शांतता प्रस्थापीत करणार्‍यांचा करा सत्कार : मान्यवरांचा सूर
प्रांताधिकारी डॉ.अजित थोरबोले म्हणाले की, बकरी ईद दरम्यान गर्दी करू नका, कोरोनाची लक्षणे आढळल्यास कोविड सेंटरला दाखल व्हा. अपर पोलिस अधीक्षक भाग्यश्री नवटके म्हणाल्या की, रावेरात शांतता भंग करणार्‍यांचा सत्कार करू नका तर शांतता प्रस्थापीत करणार्‍यांचा सत्कार करा. रावेरचे पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे म्हणाले की, बकरी ईद शांततेत साजरी करा, शहरात दंगलीमुळे उद्योगधंदे येत नाहीत, पुढच्या पीढीचे भविष्य उध्वस्त करू नका, असेही ते म्हणाले.

सहाय्यक निरीक्षकांचा गौरव
रावेर दंगल तत्काळ आटोक्यात आणल्याबद्दल सहाय्यक पोलिस निरीक्षक शीतलकुमार नाईक यांचा जिल्हा पोलिस अधीक्षक पंजाबराव उगले यांनी कौतुक केले.