Private Advt

रायसोनी बिजनेस मॅनेजमेट महाविद्यालयात ऑनलाइन राष्ट्रीय मतदार दिवस साजरा

जळगाव, ता. २५ : रायसोनी बिजनेस मॅनेजमेट महाविद्यालयात आज दिनांक २५  जानेवारी २०२२ ला राष्ट्रीय मतदार दिवस रायसोनी इस्टीट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली साजरा करण्यात आला. याप्रसंगी प्रा. डॉ. अग्रवाल या उपस्थित विद्यार्थ्याना मार्गदर्शन करताना म्हणाल्या कीआपण कुठल्याही प्रलोभनांना बळी न पडता आपल्याला प्राप्त झालेल्या संविधानिक राजकीय हक्कांचा योग्यनि:पक्षपातीनिसंकोचपणे व सदविवेक बुध्दीने  वापर केल्यास आपल्या देशाची लोकशाही सशक्त होईल . हा दिवस प्रत्येक भारतीय मतदारांसाठीनागरिकांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे. या दिवशी भारतातील प्रत्येक नागरिकाने आपल्या देशाच्या प्रत्येक निवडणुकीत सहभागी होऊन आपली जबाबदारी पार पाडण्याची शपथ घ्यावी. कारण भारतातील प्रत्येक मतदाराचे मत देशाच्या भविष्याचा पाया घालते. म्हणून प्रत्येक व्यक्तीचे मत राष्ट्रनिर्मितीत अमूल्य आहे. जगातील भारतासारख्या सर्वात मोठ्या लोकशाही मध्ये मतदानासंदर्भात घसरणारा कल पाहता मतदारांमध्ये जनजागृती करण्यासाठी राष्ट्रीय मतदार दिन साजरा केला जातो असे मत त्यांनी व्यक्त केले. व त्यानंतर सर्वांना शपथ दिली. यावेळी अकॅडमिक डीन प्रा. डॉ. प्रणव चरखा प्रा. रफिक शेख प्रा. राहुल त्रिवेदी, प्रा. तन्मय भाले, प्रा. विनोद महाजन, प्रा. स्वाती पाटीलप्रा. हिरालाल साळुंखेप्रा. मनीष महालेप्रा. अभिषेक ढोरेप्रा. शितल जाधव उपस्थित होते. शेवटी प्रा. गणेश पाटील यांनी ऑनलाईन उपस्थित सर्वांचे आभार मानले. यावेळी ११०  विद्यार्थ्यानी व महाविद्यालयातील सर्व कर्मचारी यांनी शपथ घेतली. सदर कार्यक्रमाचे यशस्वीरीत्या आयोजन केल्याबद्धल रायसोनी इस्टीट्यूटचे संचालक श्री. प्रितमजी रायसोनी यांनी अभिनंदन केले