रायसोनीमध्ये महारोजगार मेळावा

0

जळगाव । येथील जी.एच.रायसोनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटमध्ये 30 व 31 जानेवारी रोजी महा रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. रोजगार मेळाव्यासाठी अंतिम वर्षातील डिप्लोमा, अभियांत्रिकीच्या सर्व शाखेतील विद्यार्थी, कला, विज्ञान, वाणिज्य पदवी पूर्ण झालेले विद्यार्थी, कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर विद्यार्थी, (एमबीए, एमसीए, बीबीए, बीसीए, एमसीएम, एमपीएम, एमसीएम) अशा सर्वच शाखेतील विद्यार्थी मुलाखतीस पात्र राहणार आहेत. विद्यार्थ्यांनी आपले पात्रतेचे निकष दाखविणारे सर्व कागदपत्रे, दोन फोटो व बायोडेटा सह उपस्थित राहावे.

विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेण्यात येणार
रोजगार उपलब्ध होणे तितकेच सोपे व कठीणही आहे. रोजगार मिळविण्यासाठी विद्यार्थ्याला आवश्यक त्या सुप्त गुणांना विकसित करावे लागतात. रोजगाराच्या बहुतांश संधी उपलब्ध असूनही बेरोजगारीचे ओझे तरुणाई मिरवत आहे. कारण शिक्षण घेत असताना इतर व्यक्तिमत्व विकास करण्यावर विद्यार्थी भर देत नाहीत किंवा तयारी दाखवत नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांमधील संवाद कौशल्य, वर्तणूक, शिस्तबद्धपणा, सादरीकरण, क्षमता अशा विविध गुणांच्या उणीवा निर्माण होतात. त्यामुळे बेरोजगारीचे प्रमाण वाढताना दिसत आहे. मात्र रायसोनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटमध्ये विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र कौशल्य विकास विभागाची स्थापना करण्यात आलेली आहे. यामुळे विद्यार्थ्यांना नोकरी मिळविताना येणार्‍या अडचणींना सामोरे जातांना फारसा त्रास होत नाही. रायसोनी समूहातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना रोजगार मिळावा या उद्देशाने महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात येत आहे. मेळाव्यात पहिल्या दिवशी मात्र अभियांत्रिकी विभागातील विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेण्यात येणार आहेत.

कौशल्य विकास विभागाची स्थापना
रोजगार उपलब्ध होणे तितकेच सोपे व कठीणही आहे. रोजगार मिळविण्यासाठी विद्यार्थ्याला आवश्यक त्या सुप्त गुणांना विकसित करावे लागतात. रोजगाराच्या बहुतांश संधी उपलब्ध असूनही बेरोजगारीचे ओझे तरुणाई मिरवत आहे. कारण शिक्षण घेत असताना इतर व्यक्तिमत्व विकास करण्यावर विद्यार्थी भर देत नाहीत किंवा तयारी दाखवत नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांमधील संवाद कौशल्य, वर्तणूक, शिस्तबद्धपणा, सादरीकरण, क्षमता अशा विविध गुणांच्या उणीवा निर्माण होतात. त्यामुळे बेरोजगारीचे प्रमाण वाढताना दिसत आहे. मात्र रायसोनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटमध्ये विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र कौशल्य विकास विभागाची स्थापना करण्यात आलेली आहे. यामुळे विद्यार्थ्यांना नोकरी मिळविताना येणार्‍या अडचणींना सामोरे जातांना फारसा त्रास होत नाही. रायसोनी समूहातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना रोजगार मिळावा या उद्देशाने महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात येत आहे. 30 व 31 रोजी घेण्यात येणा-या रोजगार मेळाव्यात पहिल्या दिवशी मात्र अभियांत्रिकी विभागातील विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेण्यात येणार आहेत.

यासाठी रायसोनी इन्स्टिट्यूटमध्ये शिकणार्‍या आणि शिक्षण पूर्ण झालेलेच विद्यार्थी नोंदणी करून मुलाखत देऊ शकतात. तसेच 31 रोजी होणार्‍या मुलाखती खुल्या पद्धतीने घेण्यात येणार आहेत. त्यामुळे या दिवशी सर्वच शाखेतील विद्यार्थ्यांना मुलाखत देता येईल. आयोजित परिसर मुलाखतीत महिंद्रा आणि महिंद्रा, टाटा मोटर्स, आयसर, किर्लोस्कर ब्रदर्स, लिग्रेंड, मेरिको, सरस्वती फोर्ड, अशोक लेल्यांड, एअशा विविध नामवंत कंपन्याचे वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.