Private Advt

रायसोनीत तरुणाईचा “हॉस्टेल डे” जल्लोषात

0

जळगाव : जी.एच.रायसोनी इंस्टीट्युटमध्ये वसतीगृहात राहणा-या विद्यार्थ्यांसाठी “हॉस्टेल डे” २०१८ चे आयोजन करण्यात आले होते. इनटोक्झीकेषण या कायर्यक्रमात हॉस्टेलमध्ये नविन प्रवेशित विद्यार्थ्यांचे स्वागत तसेच अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांना उत्साहात निरोप देण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. विद्यार्थ्यानाचा आपसात परिचय व्हावा या मुख्य उद्देशाने हा कार्यक्रम घेतला जातो. जवळपास २५० विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला होता.

“हॉस्टेल डे”मध्ये फेशन शो अंतर्गत चेन्नई एक्सप्रेस, राजनीती, सिंग इज किंग, देवदास, ये जवानी है दिवाणी, वन्स अपोन टाइम्स इन मुंबई अशा विविध चित्रपटातील वेशभूषा तरुणाईने परिधान केले होते. नृत्य सादरीकरणात मराठ मोळी लावण्या, विविध हिंदी चित्रपटातील गाण्यांवर बहारदार सादरीकरण केले.

स्पर्धेतील विजयी स्पर्धकांना मिस्टर इनटोक्झीकेषण पुरुष- अभिषेक पाटील, मिस इनटोक्झीकेषण महिला- निकिता पाटील, बेस्ट अटायर पुरुष- वरुण डोईफोडे, बेस्ट अटायर महिला- राजश्री राजपूत, बेस्ट कपल- फैझल शेख आणि प्रतीक्षा मेघे याप्रमाणे पारितोषिके वितारीर करण्यात आली. स्पर्धेचे परीवेक्षक म्हणून प्रा.राहुल त्रिवेदी, प्रा.प्रिया टेकवाणी, लाभले होते. प्रसंगी संचालक प्रितम रायसोनी, सौ. राजुल रायसोनी, सौ.भारती रायसोनी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.