Private Advt

रायपूर विभागात रेल्वेचे दुहेरीकरण : आठ रेल्वे गाड्या रद्द

भुसावळ  : रायपुर विभागामध्ये दुहेरीकरण व विद्युतीकरणाच्या कार्यासह नॉन इंटरलॉकिंग, पॉवर ब्लॉक तसेच यार्ड रीमोल्डींगचे कार्य रायपूर-टीटलागड दरम्यान करण्यात येत आहे. या पार्श्‍वभूमीवर भुसावळ विभागातून धावणार्‍या आठ रेल्वे गाड्या रद्द करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.

या गाड्या रद्द
02857 विशाखापटनम-लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष गाडी 25 जुलै व 1 ऑगस्ट रोजी सुटणारी, 02858 लोकमान्य टिळक टर्मिनस-विशाखापटनम विशेष गाडी 27 जुलै व 3 ऑगस्ट रोजी सुटणारी,
02827 पुरी-सुरत विशेष गाडी 25 जुलै व 1 ऑगस्ट रोजी सुटणारी, 02828 सुरत-पुरी विशेष गाडी 27 जुलै व 3 ऑगस्ट रोजी सुटणारी, 09494 पुरी-गांधीधाम विशेष गाडी 26 जुलै व 2 ऑगस्ट रोजी सुटणारी,
09493 गांधीधाम-पुरी विशेष गाडी 30 जुलै व 6 ऑगस्ट रोजी सुटणारी, 02145 लोकमान्य टिळक टर्मिनस-पुरी विशेष गाडी 25 जुलै व 1 ऑगस्ट रोजी सुटणारी, 02146 पुरी-लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष गाडी 27 जुलै व 3 ऑगस्ट रोजी सुटणारी गाडी रद्द करण्यात आली आहे. रेल्वे प्रशासनाने बदलाबाबत दखल घ्यावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.