राम मंदिरावर दहशतवादी हल्ल्याचा कट: ‘रॉ’चा मोठा खुलासा

0

आयोध्या: पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या ५ ऑगस्टला अयोध्येतील राम मंदिराचे भूमिपूजन करणार आहे. मात्र राम मंदिरावर दहशतवादी हल्ल्याची तयारी पाकिस्तानकडून सुरु असल्याचा खळबळजनक खुलासा ‘रॉ’ने केला आहे. काही दहशतवाद्यांच्या गटाने भारतात प्रवेश केला आहे, काही गट प्रवेशाच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे. दहशतवाद्यांनी यासाठी अफगाणिस्तानमध्ये प्रशिक्षण घेतली आहे अशी माहितीही समोर आली आहे. ‘रॉ’ने अलर्ट जाहीर केला आहे.

आयएसआयएसआयने देखील यासाठी मोठे षडयंत्र रचले आहे. राम मंदिराच्या भूमिपूजनाची मोठी तयारी सुरु आहे. देणगी मोठ्या प्रमाणात सुरु आहे. राम मंदिराच्या निर्मितीने भारतात आनंदाचे वातावरण असताना दहशतवाद्यांच्या या कृत्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Copy