राम मंदिराबाबत सध्यातरी अध्यादेश निघणार नाही-भाजप महासचिव

0

नवी दिल्ली-लोकसभा निवडणुकजवळ आली आहे. भाजपने सत्तेत येण्यापूर्वी अयोध्येत राम मंदिर उभारण्याचे आश्वासन दिले होते. अयोध्येत राम मंदिराच्या उभारणीसाठी सरकारने अध्यादेश काढावे अशी मागणी विश्व हिंदू परिषदेने केली आहे. विहिपसोबतच आरएसएस, शिवसेना यांनी देखील अध्यादेशाची मागणी केली आहे. परंतू भाजपचे महासचिव कैलाश विजयवर्गीय यांनी सरकार सध्या तरी कोणतेही अध्यादेश आणण्याचा विचार करत नसल्याचे सांगितले आहे. मात्र अयोध्येत राम मंदिर उभारला जाईल हे नक्की असे सांगितले आहे.

भाजपशिवाय कोणत्याही पक्षात राम मंदिर उभारण्याची हिम्मत असल्याचे आरोपही त्यांनी केले आहे. राम मंदिराचा मुद्दा सध्या सर्वोच्च न्यायालयात गेलेला आहे. याबाबत १ मार्च २०१९ पर्यंत सुनावणी करण्यास न्यायालयाने मुदतवाढ दिली आहे.

Copy