राम जन्मभूमी परिसरात सापडल्या खंडित मूर्त्या आणि शिवलिंग

0

अयोध्या : अयोध्येत श्री राम जन्मभूमी परिसरात जमीन सपाटीकरणाचे काम सुरू आहे. याच दरम्यान राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टला अनेक पुरातत्व शिल्प आढळली आहेत. यामध्ये अनेक मूर्त्या, खांब आणि शिवलिंगाचा समावेश आहे. यामध्ये अनेक देवी देवतांच्या खंडित मूर्त्या, वेगवेगळ्या आकृत्यांचे आणि कलाकुसरीचे दगड, सात ब्लॅक टच स्तंभ आणि सहा लाल वाळूच्या दगडांचे स्तंभ तसेच ५ फुटांच्या आकाराचे नक्षीयुक्त शिवलिंग आहे.

याआधाही, खोदकाम सुरू असताना एएसआयला एक शिवलिंग आढळले होते. एएसआयच्या अहवालातही या परिसरात मंदिरांचे अनेक अवशेष असल्याचे म्हटले होते. आता पुन्हा एकदा अनेक मूर्त्या, खांब आणि शिवलिंग सापडले आहे. राम जन्मभूमी परसरात अनेक मंदिरांचे अवशेष असल्याचे आम्ही सर्वोच्च न्यायालयासमोरही म्हटले होते. बाबरी मशिदीच्या खाली राम मंदिराची मोठी रचना होती. आम्ही सर्वोच्च न्यायालयासमोर मांडलेले म्हणणे किती खरे होते, हे आज मिळालेल्या पुराव्यांवरून सिद्ध होत असल्याची प्रतिक्रीया हिंदू महासभेचे वकील विष्णू जैन यांनी दिली आहे.

Copy