Private Advt

रामानुजन यांचे संशोधन सर्वांसाठी प्रेरणादायी प्रा. गजानन शास्त्रींचे प्रतिपादन

 

 

शिंदखेडा (प्रतिनिधी)- केवळ 33 वर्षे आयुष्य लाभलेले थोर गणिती श्रीनिवास रामानुजन यांचे जीवन चरित्र आणि संशोधन विद्यार्थ्यासह सर्वानाच प्रेरणादायी आहे असे प्रतिपादन प्रा. गजानन

शास्त्री यांनी केले.ते शिंदखेडा येथील मीराबाई गर्ल्स हायस्कूल येथे रामानुजन जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक प्रा डी- एस. माळी होते. यावेळी समता भावसिंग गिरासे या विद्यार्थ्यांनीने रामानुजन यांच्या काही आठवणी सांगितल्या.

प्रा शास्त्री यांनी रामानुजन हे सातव्या वर्गात असतांनाच गणिती संशोधनाची चुणूक दाखवली. तामिळनाडूच्या लहानशा खेडयातून जन्मलेला बालक थेट लंडनला जाऊन प्रा हार्डी सारख्या संशोधकांनाही आश्चर्य चकीत करतो याबाबत उत्कंठावर्धक माहिती दिली.प्रा. दीपक माली यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचलन एस.जी शिंपी यांनी केले.आभार के एस परदेशी यांनी मानले