रामलल्लाची ‘ही’ मूर्ती होतेय विराजमान; पहा एका क्लिकवर

0

अयोध्या: ऐतिहासिक  राम मंदिराचे भूमिपूजन आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होत आहे. थोड्याच वेळात हा ऐतिहासिक क्षण संपूर्ण भारतवासीय अनुभवणार आहे. तत्पूर्वी जी प्रभू श्रीरामाची मूर्ती अयोध्येत स्थापन होणार आहे. त्याचे काही फोटो समोर आले आहेत. हिरव्या रंगाच्या कपड्याची वेशभूषा प्रभू श्रीरामाच्या मूर्तीला करण्यात आली आहे.

दुपारी १२.४४ मिनिटांच्या मुहूर्तावर पंतप्रधान भूमिपूजन करणार आहेत. दिल्लीहून मोदी त्यासाठी रवाना झाले आहेत. थोड्याच वेळात ते अयोध्येला पोहोचतील. त्यांच्या स्वागतासाठी अयोध्यानगरी सज्ज आहे.