राममंदिर भूमिपूजन; मोदींचा खास पेहराव

0

अयोध्या: ऐतिहासिक  राम मंदिराचे भूमिपूजन आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होत आहे. थोड्याच वेळात हा ऐतिहासिक क्षण संपूर्ण भारतवासीय अनुभवणार आहे. दुपारी १२.४४ मिनिटांच्या मुहूर्तावर पंतप्रधान भूमिपूजन करणार आहेत. दिल्लीहून मोदी त्यासाठी रवाना झाले आहेत. भूमिपुजानानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी खास वेशभूषा परिधान केला आहे. नेहमी कुर्ता-पायजामा परिधान करणाऱ्या मोदींनी राम जन्मभूमीच्या भूमिपुजानानिमित्त खास वेशभूषा केली आहे.

कुर्ता-धोती मोदींनी परिधान केली आहे. पायात बूट घातले आहे. पंतप्रधान कार्यालयाकडून मोदींचे फोटो शेअर करण्यात आले आहे.