रामदेव बाबांचा जम्मा जागरण कार्यक्रम उत्साहात

0

भुसावळ । शहरातील सोमाणी गार्डन परिसरातील रामदेव बाबा ध्यान मंदिरात जम्मा जागरणनिमित्त अमरावती येथील भजन सम्राट संगीता खंडेलवाल यांनी संगीतमय कथा, भजन आणि गीतांद्वारे श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. पं. जगदिश शर्मा यांच्या हस्ते रामदेव बाबांची पुजाअर्चा व अभिषेक करण्यात येवून 11 वाजता प्रसादाचे वाटप करण्यात आले. यावेळी समाजबांधवांनी संपुर्ण पुजा विधीत सहभाग घेतल्याने भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते.

यांची होती उपस्थिती
याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते जे.बी. कोटेचा, सत्यनारायण शर्मा, कैलास डिडवानी, नारायण डिडवानी, कांतीलाल शर्मा, विनोद शर्मा, प्रकाश विजयवर्गीय, नितीन शर्मा, चेतना शर्मा, शालिनी तिवारी, शरद बंब, धरमचंद बंब, शेखर बंब, निरंंजन रावल, रमेश शर्मा, नगरसेवक प्रा. दिनेश राठी, सतिश शर्मा, राधेश्याम लाहोटी, प्रशांत वैष्णव, अनिल जैन, शिरीष नाहाटा, सुरज नहार, प्रमोद राठी, नगिनचंद चोरडिया आदी उपस्थित होते.