रामदेववाडी येथे दोन गटात हाणमारी

0

जुने भांडण सोडविण्यासाठी बैठकीचे होते आयोजन
जळगाव – तालुक्यातील रामदेववाडी येथे जुने भांडण सोडविण्यासाठी सुरू झालेल्या बैठकीत दोन गटात वाद निर्माण होवून दगडफेक होऊन हाणामारी झाल्याची घटना गावातील रामदेव बाबा समाज मंदीरात गुरुवारी सकाळी ९ वाजता घडली. या घटनेत आठ जण जखमी झाले असून त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, याप्रकरणी १५ जणांविरुध्द एमआयडीसी पोलीस स्टेशनला दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, राठोड कुटुंबातील जुन्या भांडणाच्या संदर्भात गुरुवारी सकाळी साडे आठ वाजता रामदेववाडी येथे रामदेव बाबाच्या मंदिरात समाजाची बैठक आयोजित करण्यात आली होती. तेथे भांडणावरुन पुन्हा शाब्दीक वाद होऊन शिवीगाळ झाली. त्यानंतर सर्व जण मंदिराच्या ओट्यावरुन खाली आले असता अचानकपणे ९ वाजता दगडफेक सुरु झाली. त्यात गजानन शंकर राठोड, ज्ञानेश्वर मिश्रीलाल राठोड, सुधाकर मांगो राठोड, दादू दगडू पवार, संजय भरत राठोड, बसंतीबाई आनंदा राठोड व आनंदा प्रेम राठोड यांच्या डोक्याला तसेच हातापायाला मार लागून दुखापत झाली. गावातील अर्जून मदन राठोड हा समजाविण्यासाठी गेला असता त्याच्यावरही दगडफेक झाली. यावेळी लाठ्याकाठ्या, कुऱ्‍हाड, विळा घेऊन काही जणांनी दहशत माजविण्याचा प्रयत्न केला.

जखमींना जिल्हा रूग्णालयात दाखल
गजानन शंकर राठोड (वय- 51), ज्ञानेश्वर मिश्रीलाल राठोड (वय- 30), ज्ञानेश्वर दगडू पवार (वय- 19), सुरेश वसराम राठोड (वय- 38),
सुनिल जयराम राठोड (वय- 25), वशीबाई जयराम राठोड (वय-70), दिलीप उत्तम राठोड (वय-24), मिराबाई वसराम राठोड (वय- 65),
पांडूरंग वसराम राठोड (वय- 40), संजू भरत राठोड (वय- 25), सुधाकर मांगो राठोड (वय- 29), बसंती गजानन राठोड (वय- 44), निर्जळा
पुनमचंद राठोड (वय- 28), वासंती आनंदा राठोड (वय- 48), सोनू अर्जून राठोड (वय- 30), जनाबाई मिश्रीलाल राठोड (वय- 44), ललीत
रमेश राठोड (वय- 40), मेबाबाई दगडू पवार (वय- 60), गिता सुभाष राठोड (वय- 38), सुमित्रा भास्कर राठोड (वय- 20), छाया प्रकाश
पवार (वय- 25), सारजाबाई उखा राठोड (वय- 60), शालुबाई भरत राठोड (वय- 45), मंगला भास्कर राठोड (वय- 30), लिलाबाई उत्तम
राठोड (वय- 45), पार्वताबाई हरी राठोड (वय- 70), चामुंडाबाई शांताराम राठोड (वय- 40), रेखा गोरख राठोड (वय- 40), संजनाबाई
न्याहरलाल राठोड (वय- 70), आनंदा प्रेमा राठोड (वय- 48) यांचा जखमीत समावेश आहे.

यांच्यावर दाखल झाला गुन्हा
या वादात जखमी झालेले अर्जुन राठोड यांच्या फिर्यादीवरुन पंधरा जणांविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. त्यात पांडू वसराम राठोड, भंगराज दशरथ राठोड, सरदार गंगाराम राठोड, भाईदास उत्तम राठोड, अर्जून उत्तम राठोड, नवल पांडूरंग राठोड, ज्ञानेश्वर राजू राठोड, मिथून जवाहरलाल राठोड, सुनील जयराम राठोड, विकास हिरामण राठोड, सागर भंगराज राठोड, श्रावण कोल्हा राठोड, बद्रीबाई पांडूरंग राठोड, नतीबाई जयराम राठोड व लिलाबाई उत्तम राठोड यांच्यासह इतर ५ ते १० जणांचा समावेश आहे.

Copy