रात्री रस्त्यावर वाढदिवस साजरा केलात की गुन्हा

0

पोलीस आयुक्तांचे आदेश

पिंपरी-चिंचवड : ‘भाई का बड्डे’ म्हणत मित्र मंडळींचा वाढदिवस रात्री अपरात्री रस्त्यावर साजरा करणे. मोठमोठ्याने फटाके वाजवणे, आता महागात पडणार आहे. पोलिसांकडून अशा भाई का बड्डे साजरा करणार्‍यांवर गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. अशा वाढदिवसामुळे सामान्य नागरिकांना नाहक त्रास होत असल्याने याविरोधात कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन यांनी नुकतेच दिले आहेत. रात्री 12 वाजता भर रस्त्यात, चौकात गर्दी करून दहशत निर्माण करण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यातूनच मारामारीचे प्रकारही घडत आहेत. या प्रकारामुळे सामान्य जनता हैराण झाली आहे. या पार्श्‍वभूमीवर हे आदेश दिले आहेत.

Copy