राठोड यांची निवड

0

चिंचवड : महाराष्ट्र मजदूर संघटनेच्या पिंपरी-चिंचवड शहर बांधकाम कामगार विभाग अध्यक्षपदी नंदकिशोर किसन राठोड यांची निवड करण्यात आली आहे. संघटनेकडून शनिवारी (दि. 8) नंदकिशोर राठोड यांना निवडीबाबतचे पत्र देऊन त्यांचे अभिनंदन करण्यात आले. हा कार्यक्रम संघटनेच्या चिंचवड येथील मुख्य कार्यालयात पार पडला. यावेळी संघटनेचे अध्यक्ष कामगार नेते इरफान सय्यद, ज्येष्ठ नेते भिवाजी वाटेकर, मारुती कौदरी, राहुल कोल्हटकर, राजेंद्र कासुर्डे, सचिन पवार, सुरेश राठोड, संतोष राठोड उपस्थित होते. महाराष्ट्र मजदूर संघटना ही भारतीय कामगार सेना महासंघला संलग्न असून याचे संस्थापक अध्यक्ष इरफान सय्यद आहेत. संघटनेकडून कष्टकरी असंघटीत कामगारांच्या हिताचे कार्यक्रम राबविण्यात येत असतात.