राज ठाकरे यांचे थेट मोदींना पत्र

मुंबई – कोरोनाची साथ सुरू झाल्यापासून या कोविडचा महाराष्ट्राला सर्वाधिक फटका बसला आहे. देशातल्या पहिल्या काही रुग्णांपैकी काही महाराष्ट्रात आढळले. तेव्हापासून निव्वळ आकड्यांमध्ये मोजल्यास, सर्वाधिक रुग्ण आणि दुर्देवाने सर्वाधिक मृत्यू महाराष्ट्रात देखील झाले आहेत. आज संपूर्ण देश कोविडच्या साथीला तोंड देत असातना महाराष्ट्रातली स्थिती सर्वात बिकट झाली आहे, यामुळे महाराष्ट्राला १०० टक्के लसीकरण करण्याची गरज असल्याचे राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांनी पत्रा द्वारे कळवले आहे.

याचबरोबर राज्यातील खासगी संस्थांना लस खरेदी करता यावी व सिरमला महाराष्ट्रात मुक्तपणे पण योग्य नियम पाळून लसविक्रीची परवानगी द्यावी, लसींचा पुरवठा वेळेत व्हावा यासाठी इतर खासगी संस्थांना (उदा. हाफकिन व हिंदुस्थान अँटिबायोटिक) लस उत्पादन करण्याची मुभा दिली जावी अशी मागणी राज ठाकरे यांनी मोदींना केली आहे.