राज ठाकरेंची पहिली जाहिर सभा 14 फेब्रुवारीला

0

नाशिक । महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांची धामधूम राज्यभर सुरु आहे. प्रचारात सर्वच पक्षांनी आघाडी घेतली असताना, मनसे पक्ष काहीसा मागे पडला होता. मात्र,येत्या 14 फेब्रुवारीपासून राज ठाकरे प्रचाराला सुरुवात करणार आहेत.सर्वच पक्षांनी प्रचाराचा धडाका लावल्याने राज ठाकरे काहीसे मागे पडले होते. त्यामुळे प्रचारात उशिराने एन्ट्री करुन राज ठाकरे कशाप्रकारे बाजी मारतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. मुंबईत 14 फेब्रुवारीला म्हणजेच मंगळवारी राज ठाकरेंची पहिली प्रचारसभा आयोजित करण्यात आली आहे. राज ठाकरे मुंबईत एकूण 3 प्रचारसभा घेणार आहेत. राज ठाकरेंची पहिली सभा मुंबईत विक्रोळीमध्ये , त्याच दिवशी विलेपार्ले येथे दुसरी सभा होईल. तर तिसरी सभा 18 फेब्रुवारीला दादरमध्ये होईल. ठाणे, नाशिक आणि पुण्यातही राज ठाकरे यांच्या प्रचार सभा होणार आहेत. मात्र, मुंबई वगळता इतर सभांच्या तारखा आणि ठिकाणं यांची माहिती मिळू शकलेली नाही.