राज्य मंत्रीमंडळाचा लवकरच विस्तार; नव्या चेहऱ्यांना संधी तर काहींना मंत्रीपदावरुन डच्चू?

0

मुंबई : राज्य मंत्रीमंडळाचा विस्तार लवकरच होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या मंत्रीमंडळ विस्तारात अनेकांना झटका बसण्याची शक्यता आहे. मंत्रीपदावरुन डच्चू मिळणाऱ्या आणि मंत्रीपदी नव्यानं वर्णी लागणाऱ्यांच्या नावांची यादी दिल्लीला पाठवण्यात आली आहे. या यादीला मंजुरी मिळाली की मंत्रीमंडळ विस्ताराचा मार्ग मोकळा होणार आहे.

शिवसेनेचे मंत्री दीपक सावंत मंत्रीपदाचा राजीनामा देऊन पुन्हा मंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. एखादं जास्तीच खातं शिवसेनेला यंदा मिळण्याची शक्यता आहे. मात्र, यामुळे शिवसेनेतल्या इच्छुकांमध्ये नाराजी निर्माण होऊ शकते. त्याचा परिणाम दसरा मेळाव्यावर होऊ शकतो. हे टाळण्यासाठी दसरा मेळाव्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार करण्यात यावा, असा आग्रह शिवसेनेनं धरला आहे. मंत्रिमंडळात एकनाथ खडसे यांना परत मंत्री केले जाण्याची शक्यता आहे. त्यांच्या नावाला भाजप पक्षश्रेष्ठींकडून अजून होकार आलेला नाही.

कोणाचं मंत्रीपद जाऊ शकते?

गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता, सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले, राज्यमंत्री प्रवीण पोटे पाटील, विद्या ठाकूर यांना मंत्रीमंडळातून डच्चू मिळणार असल्य़ाची देखील चर्चा आहे. आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांची खूर्ची देखील जावू शकते.

कोणाला मंत्रीपद मिळणार?

विधान परिषदेचे सदस्य भाई गिरकर आणि मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे. विद्या ठाकूर यांच्या जागी योगेश सागर यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Copy