राज्यात सर्वात स्वस्त दरात कापडी पिशवी देऊन प्लॅस्टिक बंदीवर मात करणार

0

जिल्हा परीषदेचे माजी अध्यक्ष उखा तडवी : कुसुंबा खुर्द येथे प्रशिक्षण शिबिर

रावेर- राज्यात सर्वात स्वस्त दरात कापडी पिशवी देऊन प्लॅस्टिक बंदीवर मात करणार असल्याचा आशावाद जिल्हा परीषदेचे माजी अध्यक्ष उखा तडवी यांनी व्यक्त केला. तालुक्यातील आदिवासी पेसा ग्रामपंचायत कुसुंबा खुर्द येथे कापडी व कागदी पिशवी तीन दिवशीय प्रशिक्षण झाले. उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. हे प्रशिक्षण ग्रामपंचायत कुसुंबा व तुळजाई बहुद्देशीय संस्थेच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आले. प्रसंगी सरपंच नुरजाह तडवी, पेसा समनव्यक विक्रांत जाधव, रुबीयाना तडवी, मुबारक तडवी, सेव्हन हिल्स प्रतिष्ठानचे अध्यक्ष विशाल राठोड उपस्थित होते. जितेंद्र सोनवणे, महाजन, तुळजाई संस्थेचे अध्यक्ष भूषण लाडवंजारी आदींनी प्रशिक्षण दिले.

बचत गटांना मिळाली मोठी ऑर्डर
या तीन दिवशीय प्रशिक्षणात महिलांना कापडी व कागदी पिशव्यांचे विविध प्रकार शिकवण्यात आले शिवाय त्याची का गरज आहे या विषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी या गटांना दोन हजार 500 पिशव्यांची मागणी देखील मिळाली. या गटांनी अतिशय स्वस्त दरात पिशवी देऊ, असाही मानसही व्यक्त केला. मुबारक तडवी, विशाल राठोड, पेसा समनव्यक विक्रांत जाधव, ग्रामसेवक रुबीयाना तडवी, तुळजाई संस्थेचे अध्यक्ष भूषण लाडवंजारी यांनी परीश्रम घेतले.