राज्यात लॉकडाऊन कायम: मुख्यमंत्र्यांची घोषणा

0

मुंबई: कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता संपूर्ण देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. केंद्र सरकारने 30 जूनपर्यंत हा लॉकडाऊन वाढवला होता. त्यानंतर आता पुढे लॉकडाऊन उठणार की कायम राहणार हा प्रश्न सर्वांसमोर आहे. दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊन उठवण्याची सध्या स्थिती नसून लॉकडाऊन कायम राहणार असल्याचे घोषणा केली आहे. आज मुख्यमंत्र्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे राज्यातील जनतेशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. लॉकडाऊन सोबतच रुतलेल्या अर्थचक्राला पुन्हा गती देण्यासाठी ‘बिगीन अगेन’म्हणून हळूहळू सर्व व्यापार व्यवसायांना सुरू करण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. त्यामुळे लॉकडाउन असले तरी सर्व उद्योग व्यवसाय सुरू राहणार आहे असेही त्यांनी सांगितले.

CM Uddhav Balasaheb Thackeray addressing the State https://t.co/B1YyHk36XR

बोगस बियाणे देणाऱ्यांवर कारवाई करणार

कोरोनाच्या संकटात शेतकरी वर्ग अडचणीत असतांना बोगस बियाणे बाजारात आल्याने शेतकऱ्यांची फसवणूक होत आहे.हीबाब गंभीर असून शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्यांची हयगय केली जाणार नाही, गुन्हा दाखल करण्यात येईल असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी दिला आहे.

Copy