राज्यात पोलिसांच्या हाती आता हायटेक काठी

0

नाशिक । लाकडी किंवा फायबर काठी घेऊन फिरणार्‍या पोलिसांच्या हाती आता ङ्गहायटेक काठीफ पाहायला मिळणार आहे. नाशिकमधील एका तरुणाने पोलिसांसाठी हायटेक काठी तयार केली आहे. चेतन नंदने असे या तरुणाचे नाव आहे. पोलिसांना अत्याधुनिक बनवण्यासाठी चेतन नंदनेचे प्रयत्न सुरु आहेत.

त्याच्या या प्रयत्नांना यशही मिळाले आहे. हॉलिवूडमधील तंत्रज्ञान पाहून चेतनला पोलिसांच्या हायटेक काठीची कल्पना सूचली.नाशिकमधील संदीप यूनिव्हर्सिटीत इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशनमध्ये इंजिनिअरिंगच्या तिसर्‍या वर्षात चेतन शिकतोय. हायटेक काठीची जीपीएसटॉर्च, मेटल डिटेक्टर , कॅमेरा, इलेक्ट्रिक शॉकबॅटरी ही वैशिष्ट्येे आहेत. एका काठीसाठी सुमारे 10 हजार रुपये खर्च आला आहे. मात्र, कल्पना सत्यात उतरल्याने त्याला आनंद झाला आहे. चंद्रपूर पोलिसांनी 134 काठ्या वापरण्यास सुरुवात केली आहे.