राज्यात कोरोनाचे सहा नवे रुग्ण; संख्या 159 वर

0

मुंबई:राज्यात कोरोनाचे आज पुन्हा सहा नवे रुग्ण आढळले आहेत. यामध्ये मुंबईतील पाच आणि नागपूरमधील एक रुग्ण आहे. राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या १५९वर गेली आहे. राज्यात कोरोनामुळे आतापर्यंत ५ जणांचा मृत्यू झाला आहे. काल राज्यात एकूण १७ नवे रुग्ण आढळून आले होते. त्यात सांगलीतील १२ जणांचा समावेश होता, तर नागपूरमधील ५ जणांचा समावेश होता. देशभरात कोरोनाचे १९ नवे रुग्ण आढळल्याने देशातील या रुग्णांची संख्या ८३४वर पोहोचली असून, देशात आतापर्यंत २० जणांचा मृत्यू झाला आहे.

Copy