राज्यातील २२ जिल्ह्यांना निर्बंधांमध्ये सूट

मुंबई – राज्यात करोना संसर्गाची दुसरी लाट नियंत्रणात येत असल्याने महाराष्ट्र सरकारने ब्रेक द चेन अंतर्गत सुधारित आदेश जारी केला. २२ जिल्ह्यांना निर्बंधांमधून मोठ्या प्रमाणात सूट देण्यात आली आहे. सुधारित आदेश तत्काळ प्रभावाने लागू करण्यात येणार आहे.

– सर्व प्रकारचे जीवनावश्यक वस्तू तसेच जीवनावश्यक वस्तू विक्री न करणारी दुकाने तसेच मॉल्स सोमवार ते शुक्रवार रात्री ८ वाजेपर्यंत आणि शनिवारी दुपारी ३ पर्यंत सुरु राहतील.

– सर्व सार्वजनिक उद्याने, मैदाने व्यायाम, चालणे, धावणे, सायकलिंग आदींसाठी खुले करण्यात आले आहेत.

– सर्व शासकीय व खासगी कार्यालये पूर्ण क्षमतेने सुरु ठेवणार.

– जी कार्यालये वर्क फ्रॉम होम पद्धतीने सुरू ठेवता येऊ शकतात ती तशी सुरू ठेवण्याची सूचना.

– सर्व प्रकारची शेतीविषयक कामे, बांधकाम, वस्तूंची वाहतूक, उद्योग हे पूर्ण क्षमतेने सुरू राहतील.

– जीम, व्यायामशाळा, योगा केंद्र, ब्युटी पार्लर्स, केश कर्तनालय यांनी वातानुकूलन वापरायचे नसून, सोमवार ते शुक्रवार रात्री ८ वाजेपर्यंत ५० टक्के क्षमतेने सुरू ठेवता येतील. शनिवारी दुपारी ३ पर्यंत आणि रविवारी पूर्ण बंद राहतील.

– चित्रपटगृहे, नाट्यगृहे, तसेच मॉल्समधील मल्टीप्लेक्स हे बंद राहतील. यात कोणतीही सूट नाही.

– राज्यातील सर्वधर्मियांची प्रार्थना स्थळे बंदच

– शाळा, महाविद्यालयांच्याबाबतीत शालेय शिक्षण व उच्च शिक्षण विभाग निर्णय घेईल.

– सर्व उपाहारगृहे ५० टक्के आसन क्षमतेसह सायंकाळी ४ वाजेपर्यंत सुरु राहतील. मात्र आरोग्याच्या कोविडविषयक नियमांचे पालन करावे लागेल. टेक अवे किंवा पार्सल सेवा सध्याप्रमाणे सुरू ठेवता येईल.

– रात्री ९ ते सकाळी ५ या वेळेत अत्यावश्यक कारणांशिवाय बाहेर पडता येणार नाही.

– गर्दीमुळे संसर्ग वाढू नये म्हणून वाढदिवस समारंभ, राजकीय सामाजिक, सांस्कृतिक समारंभ, निवडणुका, प्रचार, मिरवणुका, निदर्शने, मोर्चे यांच्यावरील निर्बंध कायम

Copy