राज्यातील खेळाडूंचीही व्हावी कोरोना चाचणी

0

भुसावळ : संपूर्ण जगामध्ये थैमान घातलेल्या आणि दहशत माजवलेल्या कोरोना या आजाराने आज आपल्या देशासह महाराष्ट्रात ही थैमान घातले आहे. याच अनुषंगाने महाराष्ट्रातील सर्व खेळाडू जे ग्रामीण व शहरी भागात आपल्या कलेची कसब दाखवतात अश्या राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय स्तरावर खेळून आपला खेळ आणि खेळातील प्रावीण्य टिकवून ठवणार्‍या खेळाडूंची राज्य शासनाने कोरोना तपासणी चाचणी करावी, अशी मागणी क्रीडा क्षेत्राचे राष्ट्रीय युवा प्रेरणास्रोत निलेश मधुकरराव राणे यांची मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. दरम्यान, पाठविलेल्या पत्राची दखल मुख्यमंत्री कार्यालयाकडून घेण्यात आली असून हे पत्र संबंधित विभागाला पाठविण्यात आल्याचे राणे यांनी कळवले आहे.

Copy