राज्यातील काँग्रेस फुटीच्या उंबरठ्यावर ?

आमदारांचा मोठा गट भाजपच्या वाटेवर

मुंबई (प्रफुल्ल साळुंखे) : राज्यात दुसरा राजकीय भूकंपाची तयारी पूर्ण झाली आहे. या भूकंपाने काँग्रेसची वाताहत होईल हे नक्की आहे. काँग्रेसच्या दहा आमदारांचा एक गट भाजपमध्ये प्रवेश करतोय. बुधवारी अथवा गुरुवारी या गटाचा भाजप प्रवेश होईल, अशी माहिती मिळाली आहे. शिवसेनेत मोठी फूट पडल्यानंतर भाजपने आपलं लक्ष आता काँग्रेसकडे वळवले आहे. गेल्या वर्षभरापासून भाजप नेत्यांकडून काँग्रेस नेत्याशी संपर्क सुरू आहे. याला आता यश आले आहे. राज्यातील सहकार सम्राट विषेशतः शिक्षण सम्राट असलेल्या आमदारांचा या फुटीर गटात सहभाग असेल, अशी माहिती समोर येत आहे.

या जिल्ह्यातील आमदार करणार भाजपामध्ये प्रवेश
फुटीर आमदारामध्ये धुळे, सोलापूर, नांदेड, मुंबई उपनगर, कोल्हापूर या जिल्ह्यातील आमदारांचा समावेश असेल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. या बरोबरच विधान परीषदेत संधी न मिळालेले आणि परीषदेत पराभूत झालेल्या एका मोठ्या नेत्याचादेखील समावेश असेल, अशी माहिती ही सूत्रांनी दिली आहे. काँग्रेसमधून फुटून बाहेर पडणार्‍या आमदारांपैकी काही आमदार मुंबईच्या दिशेने निघाले आहेत, यांचा बुधवारी पक्षप्रवेश होईल, अशी माहिती समोर येत आहे.

मेडिकल कॉलेज चालक आमदार रडारवर
अनेक पक्षाचे नेते भाजपमध्ये येतील हे केंद्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांचे वक्तव्य समोर आले असताना य वक्तव्याला पूरक महाराष्ट्र काँग्रेसमध्ये दिसेल हे नक्की होईल. या विधान परीषद निवडणुकीत काँग्रेसमध्ये झालेले वाद, प्रदेशाध्यक्ष यांच्याविषयी असलेले नाराजी हे एक मोठे कारण सांगितले जात असले तरी, प्रवेश करणार्‍या आमदाराच्या मेडिकल कॉलेज गेल्या वर्षभरापासून केंद्र सरकारच्या रडारवर असल्याची माहितीही सूत्रांनी दिली आहे.