राज्यस्तरीय समितीने केली मॉडल शौचालयाची पाहणी

0

रावेर । येथील सार्वजनिक हायटेक मॉडल शौचालयाची शनिवार 11 रोजी राज्यस्तरीय आरोग्य समितीने भेटी देऊन पाहणी केली. राज्य स्तरावरील समिती पाहणी करून गेली असून त्यांचा गोपनीय अहवाल प्रशासनाकडे ते सादर करणार आहेत. पाहणी दरम्यान समितीमध्ये किशोर बोर्डे, एम.बी. खोडके, दुर्गा फड, मुख्याधिकारी अशोक बागुल यांचा समावेश होता.

यांची होती उपस्थिती

या राज्यस्तरीय समितीने पालिका प्रशासनाने शहरात हागणदारीमुक्तीसाठी केलेल्या विविध उपाययोजनांची पाहणी केली. शहरातील रसलपुर रोड, मंगळुर दरवाजा, आठवडे बाजार परिसरात केलेल्या सार्वजनिक हायटेक मॉडल शौचालयाला भेट दिले. तसेच वैयक्तिक शौचालयालासुद्धा भेट देऊन पाहणी केली. नंतर नगरपालिका सभागृहात नगराध्यक्ष दारा मोहम्मद यांसह पदाधिकार्‍यांची बैठक घेऊन शौचालयाच्या विविध विषयावर मार्गदर्शन केले. यावेळी पालिकेत नगराध्यक्ष दारा मोहंम्मद, उपनगराध्यक्ष सुधीर पाटील, मुख्यध्याकारी राहुल पाटील, बांधकाम इंजिनीअर प्रदीप धनके, मुन्ना अग्रवाल, शिरीष वाणी, दीपक नगरे व सर्व कर्मचारी उपस्थित होते.