राज्यस्तरीय शॉर्ट पिच क्रिकेट स्पर्धेत जिल्हा संघ उपविजयी

0

भुसावळ- राज्य शॉर्ट पिच क्रिकेट अससोसिएशनच्या मान्यतेने गोंदिया जिल्हा शॉर्ट पिच क्रिकेट असोसिएशनद्वारे आयोजित पहिल्या स्वामी विवेकानंद कप राज्य ज्युनिअर शॉर्ट पिच क्रिकेट स्पर्धा नुकतीच गोंदियात झाली. त्यात राज्यभरातील 18 मुलांचे व आठ मुलींचे संघ सहभागी झाले. मुलींच्या संघात जळगाव जिल्हा संघाने सेमिफायनलमध्ये नागपूर ग्रामीण संघाने दिलेले 45 रनचे आव्हान अवघ्या तीन षटकात पूर्ण करीत अंतिम सामन्यात प्रवेश केला. या सामन्यात कामिनी सपकाळे, नेहा पाटील, काजल बरोट, दुर्गा अहिरे, हेमांगी सुरळकर, राजश्री नाफडे, छकुली नाले, स्मिता बोरकर, हेमलता नाफडे यांनी उत्कृष्ट खेळी करत विजयश्री खेचून आणली. संघास विशाल पाटील, कुंदन बर्‍हाटे, अमोल बारोट यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. अंतिम सामन्यात अमरावती संघर्ष विजेता ठरला तर द्वितीयस्थायी जळगावचा संघ तर तृतीय स्थानी नागपूर ग्रामीणचा संघ राहिला. मुलांच्या संघात प्रथम ठाणे, द्वितीय लातूत तर अमरावती संघाने तृतीय स्थान मिळवले.

यांच्या हस्ते खेळाडूंचा गौरव
बक्षीस वितरण आमदार गोपाळ अग्रवाल, शॉर्ट पिच क्रिकेटचे अध्यक्ष प्रदीप साखरे, सचिव इंद्रजीत नितनवार, सह सचिव जयकुमार रामटेके, गोंदिया जिल्हा सचिव अनिल सहारे यांच्या हस्ते करण्यात आले. पंच म्हणून प्रवीण परुळेकर, दीपक कात्रे, अमर आदींनी काम पाहिले.

Copy