राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत नवापूरचा कुशलकुमार माळी प्रथम

0

नवापूर:’एक मित्र एक वृक्ष ग्रुप’ पुणेतर्फेआयोजित लॉकडाऊनच्या काळात पर्यावरण संवर्धनाची जाणीव जागृती व्हावी हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून काळात चित्रकला, रांगोळी, निबंध व ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेचा नुकताच निकाल जाहीर झाला. या स्पर्धेसाठी ‘पर्यावरण रक्षण काळाची गरज’ हा विषय देण्यात आला होता. या विषयावर आधारित संपूर्ण महाराष्ट्रातून स्पर्धकांचे व्हिडीओ ऑनलाइन पद्धतीने मागविण्यात आले होते. यात सर्व व्हिडिओ पैकी अंतिम निवड यादीत 35 स्पर्धक होते. त्यातून तीन विजेत्या स्पर्धकांच्या निकालात प्रथम क्रमांक कुशलकुमार नितीनकुमार माळी (नवापूर), द्वितीय सिद्धी सनतकुमार काळे (श्रीरामपूर), तृतीय क्रमांक प्रियदर्शनी महेश भोंग (दौंड) विजेत्या स्पर्धकांना रुपये पाचशे स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र पोस्टाद्वारे पाठवण्यात आल्याचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश मुथा यांनी कळविले.परीक्षेचे परीक्षक म्हणून महादेव पंडित, सुभाष फासगे आणि युवराज घोगरे यांनी काम बघितले.

यशस्वितेसाठी दादा गावडे कानिफनाथ मांडगे, लहू धायगुडे तसेच ‘एक मित्र एक वृक्ष’ या ग्रुपच्या सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले.

Copy