राज्यपाल नियुक्त आमदारांची यादी आज राज्यपालांकडे

0

मुंबई: विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त १२ आमदारांची यादी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर झाली आहे. मात्र अद्याप नावे जाहीर करण्यात आलेले नाही. दरम्यान आज शुक्रवारी महाविकास आघाडीतील तीनही पक्षाचे नेते राज्यपालांची भेट घेणार असून राज्यपाल नियुक्त आमदारांच्या नावाची यादी सुपूर्द करणार आहे. सायंकाळी ६ वाजता राजभवनावर जाऊन यादी दिली जाणार आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यपाल नियुक्त आमदारांच्या नियुक्तीवरून पेच निर्माण झाला आहे. निवडीवरून तर्क-वितर्क सुरु आहे. आज नावांची घोषणा होण्याची शक्यता आहे.

नुकतेच राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये एकनाथराव खडसे यांनी प्रवेश केला आहे. त्यांचे नाव निश्चित मानले जात आहे. राष्ट्रवादीकडून शेतकरी नेते राजू शेट्टी, आनंद शिंदे यांच्या नावाची चर्चा आहे.

Copy