राजेंद्र पाटील यांना ‘तंटामुक्ती’ पुरस्कार

0

जळगाव : महाराष्ट्र शासनाच्या महात्मा गांधी तंटामुक्त गाव माहिमेच्या प्रसिध्दीसाठी पत्रकारांना देण्यात येणार्‍या सन 2014-15 या वर्षाचे पुरस्कार राज्य शासनाच्या गृह विभागाने परिपत्रकाद्वारे जाहीर केले असून जळगाव जिल्ह्यातून दै.देशदूतचे उपसंपादक राजेंद्र पाटील यांना जिल्हास्तरीय तृतीय क्रमांकाचा पुरस्कार मिळाला असल्याचे जिल्हा माहिती कार्यालय जळगावने कळविले आहे.

देशदूतचे उपसंपादक म्हणून कार्यरत
राजेंद्र पाटील यांना यापूर्वी महाराष्ट्र शासनाचा सन 2010 मध्ये ‘लोकराज्य ग्राम’ पुरस्कार मिळाला आहे. तसेच त्यांनी तरसोद (ता.जळगाव) च्या महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीमेच्या अध्यक्षपदी राहुन या योजनेअंतर्गत सन 2012-13 यावर्षी उत्कृष्ट कामगिरी करून आपले गाव तंटामुक्त करून तीन लाखाचा पुरस्कार गावाला मिळवून तरसोद गावाचा नावलौकीक वाढला आहे. राजेंद्र पाटील यांनी महाराष्ट्र शासनाच्या महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान अंतर्गत विविध उपक्रमांची माहिती वृत्तपत्रामधून जिल्ह्यातील तळागाळातील जनतेपर्यंत शासनाच्या विविध योजनांची माहिती पोहचविण्याचे काम ते करीत असतात. या पुरस्कारात रू.10 हजाराचा धनादेश व प्रशस्तीपत्राचा याचा पुरस्कारात समावेश आहे.