राजीनाम्यावरून सेना-भाजपमध्ये कलगीतुरा

0

मुंबई । भाजपवर दबाव टाकण्याच्या प्रयत्नात शिवसेना आहे. त्यासाठी शिवसेनेचे मंत्री राजिनाम्याच्या तयारीत असल्याचे सातत्याने बोलले जात आहे. त्याचे मुहूर्तही वर्तमानपत्रात छापून येत आहेत. त्यावर संघाचे ज्येष्ठ नेते मा. गो. वैद्य यांनी खोचक सल्ला दिला आहे तर वैद्य यांच्यावर निलम गोर्‍हे यांनी बोचरी टीका केली आहे.

वैद्य-गोर्‍हे यांच्यात पेटले रण

‘राजीनामे नुसते खिशात ठेऊन चालत नाही तर ते द्यावे लागतात.’ शिवसेनेला असा खोचक सल्ला देणार्‍या संघाचे ज्येष्ठ नेते मा.गो वैद्य यांनी दिला आहे. देसाईंसारखे काही मंत्री चांगले कामही करत आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या मंत्र्यांनी राजीनामे दिले तर त्यांच्याच पक्षात फूट पडेल असे भाकित वर्तवत त्यांनी शिवसेनेला सूचक इशारा दिला. ‘आमच्या खिशावर वैद्य सरांचे लक्ष का? याचा मला खेद वाटतो, अशा शब्दात शिवसेना नेत्या निलम गोर्‍हे यांनी शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली.