राजस्थान सरकार टिकणार की पडणार?: आजच रात्री होईल स्पष्ट

0

जयपूर : राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यातील वाद आता विकोपाला गेला आहे. सचिन पायलट यांच्याकडून सरकार पडण्याच्या हालचाली सुरु असल्याचे चित्र आहे. सचिन पायलट जवळपास २५ आमदार घेऊन दिल्लीत दाखल झाले आहे. तेथे ते भाजपच्या नेत्यांच्या संपर्कात असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी कॉंग्रेस आमदार आणि मंत्र्यांना तातडीने आज रात्री बैठकीला उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहे. आहे त्या ठिकाणाहून रात्री बैठकीला येण्याचा फर्मान गेहलोत यांनी सोडले आहे. त्यामुळे आज रात्री जयपूरला होणाऱ्या बैठकीला किती आमदार उपस्थित राहणार? याकडे लक्ष लागले आहे. या बैठकीला बहुमतासाठी आवश्यक आमदार उपस्थित राहिल्यास सरकार टिकेल आणि बहुमतासाठी आवश्यक आमदार हजर नसल्यास सरकार पडणार हे आज रात्रीच्या बैठकीत जवळपास स्पष्ट होणार आहे.

काल शनिवारी दुपारी भाजपाच्या दोन नेत्यांना सरकार पाडण्याचे कारस्थान रचल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आली होती. यावरूनच एसओजीने मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांना नोटीस पाठविली असून चौकशीला हजर राहण्यास सांगितले आहे.

2018 मध्ये सरकार बनल्यापासूनच त्यांच्यात वाद असल्याचे समोर येत होते. त्यात ज्योतिरादित्य सिंधिया हे पायलट यांचे मित्र असल्याने ते देखील सरकार पाडण्यासाठी काही प्रयत्न करणार आहेत. पायलट दिल्लीला आमदारांसह काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या भेटीला जाण्याचा प्रयत्न आहे. हे आमदार गुडगावच्या आयटीसी ग्रँड हॉटेलमध्ये थांबलेले असून काही अन्य आमदार दिल्लीच्या आयटीसी मोर्या हॉटेलमध्ये थांबले आहेत.

Copy