राजस्थान निवडणूक: मोदी आज घेणार शेवटची सभा !

0

जयपुर: राजस्‍थान विधानसभेच्या निवडणुकीमुळे राजकीय रण तापले आहे. भाजपच्या निवडणुकीतील सर्वात मोठे प्रचारक असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राजस्थानमध्ये शेवटची सभा घेणार आहे. ७ रोजी मतदान होणार आहे. हनुमानगड, सीकर आणि शेवटची सभा जयपुर येथे घेणार आहे. शेवटची सभा असल्याने राजस्थानमध्ये १० ठिकाणी मोदींची सभा घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. काल देखील मोदींनी सभा घेतल्या. उद्या निवडणुकीचा प्रचार बंद होणार आहे.

जयपूर जिल्ह्यातील १९ उमेदवारांसाठी मोदी आज सभा घेणार आहे. निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात भाजपचे कार्यकर्ते, पदाधिकारी घरोघरी जाऊन प्रचार करत आहे.

Copy