राजस्थान निवडणूक: कॉंग्रेसकडून भाजपवर ‘फिल्मी स्टाईल वॉर’!

0

जयपुर। राजस्थान विधानसभा निवडणुकीसाठी होणाऱ्या मतदानाला केवळ ३ दिवस शिल्लक राहिले आहे. शेवटच्या टप्प्यात प्रचार मोहिमा आहेत. त्यामुळे सर्वच पक्ष प्रचारासाठी विविध साधनाचा वापर करीत आहे. राजकीय पक्षांकडून स्टार प्रचारकांना मैदानात उतरविले आहे. शिवाय सोशल मिडीयावर प्रचाराने जोर धरला आहे. नेहमीप्रमाणे कॉंग्रेस सोशल मिडीयावरील प्रचारात अग्रेसर असल्याचे दिसून येते.

सत्ताधारी भाजपसमोर कॉंग्रेसने आव्हान उभे केले आहे. कॉंग्रेसने ऑनलाइन अभियान सुरु केले आहे. कॉंग्रेसकडून नवनवीन हॅशटॅगचा उपयोग करून कॉंग्रेस कार्यकर्ते भाजपवर निशाना साधत आहे. अतिशय मनोरंजन याद्वारे होत आहे. विविध व्हिडियो, ग्राफिक्स याद्वारे भाजपवर हल्लाबोल केला आहे.

Copy